बांगला देशातील निवडणुका 23 ऐवजी 30 डिसेंबरला होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/bangladesh-election-693x420-1.jpg)
ढाका (बांगला देश) – बांगला देशात होणारी 11 वी सार्वजनिक निवडणूक 23 डिसेंबर ऐवजी 30 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने आजच निवडणूक तारखेतील बदलाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांची आघाडी-यूएनएफने निवडणूक लढवण्याबाबत निवडणूक आयोगाला विश्वस्त केल्याने पाच सदस्य असलेल्या आयोगाने निवडणुकांच्या तारखांत बदल कारण्याचा निर्णय घेतला, असे मुख्य निवडणूक आयुक्त नुरूल हुदा यांनी सांगितले.
ही निवडणूक एक महिना पुढे ढकलावी अशी एनयूएफ (नॅशनल युनिटी फ्रंट) या विरोधी पक्षांच्या आघाडीची मागणी होती. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा बीएनपी (बांगला नॅशनलिस्ट पार्टी) हा पक्ष आघाडीचा प्रमुख घटक आहे. आगामी निवडणूक आपला पक्ष लढवणार असल्याचे खालिदा झिया यांनी जाहीर केले आहे.
खालिदा झिया यांच्या बीएनपी पक्षाच्या निवडणुकीतील सहभागाबद्दल अनिश्चितता होती, ती खालिदा झिया यांच्या घोषणेने दूर झाली आहे. मागील निवडणुकीवर बीएनपीने बहिष्कार टाकल्यामुळे शेख हसीना यांच्या अवामी लीगला सत्ता मिळाली होती.