Breaking-newsआंतरराष्ट्रीय
बांगलादेशकडून कमी खरेदी; भारतीय तांदूळ अडचणीत
![# Covid-19: Falling basmati prices due to corona virus outbreak](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/rice-1-6-1.jpg)
नवी दिल्ली : बांगलादेशकडून होणारी आयात कमी झाल्याचे लक्षात घेता सध्याच्या आर्थिक वर्षात देशातून होणारी तांदळाची निर्यात ०.५-१ मिलियन टनांनी (मेट्रिक टन) कमी होण्याची शक्यता आहे.
बांगलादेश, आफ्रिका आणि श्रीलंकेतून असलेल्या मागणीमुळे मागील आर्थिक वर्षात भारतीय तांदळाची निर्यात दरवर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढून १२.७ मेट्रिक टन झाली होती.त्यामुळे भारतातून विक्रमी निर्यात नोंदवली गेली होती.
सन २०१७ मध्ये भाव वाढल्याने स्थानिक उत्पादन वाढवण्यात आले. त्यामुळे २०१८-१९ मध्ये बांगलादेशकडून होणारी आयात कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१९ मध्ये १ मिलियन टनांनी तांदळाची निर्यात घटू शकते, असा अंदाज आहे. यामुळे भारतीय तांदूळ निर्यातदार अडचणीत आले आहेत.