Breaking-news
बंडारू दत्तात्रय यांना पुत्रशोक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/bandaru-d-son-.jpg)
हैदराबाद – केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांना पुत्रशोक झाला आहे. त्यांचे पुत्र वैष्णव यांचे काल रात्री हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले ते केवळ 21 वर्षांचे होते. ते सध्या एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते.
काल रात्री त्यांच्या अचानक छातीत दुखु लागले आणि त्यांना जडजड वाटू लागल्याची तक्रार त्यांनी केली. त्यांना तातडीने हॉस्पीटल मध्ये नेण्याची व्यवस्था करण्यात आली पण ते वाचू शकले नाहीत.
आज साईदाबाद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल इएसएल नरसिंहन आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तीव्र दुख: व्यक्त केले आहे.