breaking-newsराष्ट्रिय

फ्रान्सहून झेपावलेली राफेल विमानांची पहिली तुकडी आज भारतात दाखल होणार

नवी दिल्ली – बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहे. 27 जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही 5 विमाने भारताच्या दिशेने झेपावली आहेत.

२०१६ साली भारताने फ्रान्स सरकारबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. त्यानुसार पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी आयएएफचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button