breaking-newsआंतरराष्टीय

फेसबूक आणि इंस्टाग्रामच्या यूजर्स पॉलिसीमध्ये मोठा बदल

न्युयॉर्क – फेसबूक आणि इंस्टाग्रामवर जर तुम्हाला अकाऊंट काढायचे असेल तर तुम्हाला आता तुमचे ऑफीशियल फोटो आयडी म्हणजे वैध ओळखपत्र असणे आवश्‍यक असणार आहे. याचे कारण म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम आता कमी वयाच्या युजर्सवर लक्ष देण्याचे नियोजन करत आहे. त्यामुळे आता युजरला जर अकाऊंट काढायचे असेल तर त्याला त्याच्या वैध ओळखपत्रावरुन आपल्या वयाचा पुरावा द्‌यावा लागणार आहे.

आता या साईट्‌सवर काम करणाऱ्या नियंत्रकांना जर युजरचे वय हे 13 वर्षांखालिल असल्याचे लक्षात आले तर ते तात्काळ त्या युजरचे अकाऊंट लॉक करणार असून त्यासंदर्भात कंपनीकडून युजर अकाऊंट्‌सची पडताळणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. अशी माहीती मिळाली आहे.

एका वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या डॉक्‍यूमेंट्रीवरुन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील प्रदर्शीत झालेल्या या डॉक्‍युमेंट्रीच्या अवाहालामध्ये एक खुलासा करण्यात आला होता. ज्यात ब्रिटनमध्ये 12 वर्षाखालील निम्यापेक्षा जास्त मुले व 10 वर्षांच्या एक चतुर्थांश मुलांचे सोशल मीडियावर अकाउंट आहेत अशी माहिती देण्यात आली होती.

सध्या फेसबूक आणि इंस्टाग्रामवर अकाउंट काढण्यासाठी युजर्सचे किमान वय हे 13 वर्ष असण्याचा नियम आहे. मात्र, आतापर्यंत फेसबूक आणि इंस्टाग्रामने या नियमानुसार अकाऊंट्‌स वर कोणतीही कार्यवाही केलेली नव्हती. सोशल साईटवर अकाउंट काढायचे असल्यास युजर्सला त्याची जन्मतारीख विचारली जाते, पण त्याची पडताळणी केली जात नाही. म्हणजे जन्मतारीख खरी आहे की खोटी याची पडताळणी केली जात नाही. याचाच फायदा घेत युजर्स खोटी जन्मतारीख सांगून अकाउंट काढतात. यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button