Breaking-news
फेसबुकने 3 कोटी पोस्ट केल्या डिलीट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/facebookt-PHOTO.jpg)
मुंबई : सोशल मिडीयावर एखादी घटना, त्या घटनेचे फोटो-व्हिडीओ अगदी काही सेकंदाच व्हायरल होतात. तसंच अनेक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर पाहायला मिळतात. यासाठीच फेसबुकने महत्त्वाचं पाऊस उचललं आहे. 2018च्या पहिल्या तीन महिन्यात फेसबुकने जवळपास तीन कोटी पोस्ट डिलीट केल्या आहेत. आक्षेपार्ह मजकूर, फोटो व व्हि़डीओंचा यात समावेश आहे.
केंब्रिज अॅनालिटिका डेटा प्रायव्हसी प्रकरणानंतर फेसबुकने पारदर्शकतेसाठी कम्युनिटी स्टॅडर्डच्या अंतर्गत सादर केलेल्या रिपोर्टमध्ये पोस्ट डिलीट केल्याचं सांगितलं. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत फेसबुकने जवळपास 3 कोटी 40 लाख पोस्टवर कारवाई केली आहे. फेसबुकच्या माध्यमातून समाजात द्वेषाची भावना पसरविण्यासाठी याचा वापर होत असल्याचा विचार करत फेसबुकने पोस्ट डिलीट केल्या आहेत.