breaking-newsटेक -तंत्र

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी WhatsAppचं नवं फिचर

मुंबई : WhatsApp नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. आताही व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सच्या मदतीसाठी खास फिचर अपडेट केलं आहे. या नव्या फिचरनुसार, आता युजर्सना फेकन्यूजबाबत जाणून घेणं शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त युजर्स आता 70 हून अधिक देशांतील फॅक्ट चेकर्सशी जोडले जाऊ शकतात. पॉयन्टर इंस्टीट्यूटच्या इंटरनेशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (IFCN)सोबत फेसबुकची मालकी असलेली कंपनी WhtsApp ने भागीदारी केली आहे. IFCN ने WhatsApp वर आपला चॅटबॉट लॉन्च केला आहे.

हे फिचर कसं करतं काम?

चॅटबॉटचा नंबर +1 (727) 2912606 हा आहे. पहिल्यांदा हा नंबर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा लागेल. चॅटबॉट सुरु करण्यासाठी ‘हाय’ शब्द लिहून या नंबरवर मेसेज सेंड करा. IFCN चं हे चॅटबॉट आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. दरम्यान, कंपनी चॅटबॉट लवकरच हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगालीसह इतर भाषांमध्ये अपडेट करू शकते.

चॅटबॉटच्या मदतीने युजर्स फॅक्ट चेक करू शकतात. त्याचबरोबर कोरोना व्हायरसशी निगडीत अन्य बातम्यांबाबतही जाणून घेऊ शकतात. ही सिस्टिम युजर्सना कंटरी कोडच्या आधारावर ओळखते. दरम्यान, WhatsApp वर सर्व मेसेज अॅन्ड-टू-अॅन्ड एन्क्रिप्शनसोबत येतात. त्याचबरोबर युजर्स याबाबतची अधिक माहिती व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मिळवू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button