breaking-newsआंतरराष्टीय
फिफा विश्वचषक : सौदी अरेबियाची इजिप्तवर 2-1 ने मात
रशिया – फिफा विश्वचषकात ‘ए’गटातील सौदी अरेबियाने इजिप्तवर 2 -1 असा विजय मिळवला आहे. सौदी अरेबियाचा हा फिफा विश्वचषकातील मागील 24 वर्षातला हा पहिलाच विजय ठरला आहे.
वोल्गोग्रॅड अरेनात येथे हे सामने झाले. या सामन्यात मोहम्मद सलाहने 22 व्या मिनिटाला गोल करुन इजिप्तसाठी गोलचे खाते उघडले. मात्र मध्यंतराला काही अवधी असतानाच सौदी अरेबियाच्या फराजने पेनल्टी कीकवर गोल करून सौदी अरेबियाला 1-1 अशी बरोबरी करुन दिली. मध्यांतरानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. यानंतर भरपाई वेळेत पाचव्या मिनिटाला सालेमने निर्णायक गोल करुन इजिप्तला 2-1 ने पराभूत केले.