breaking-newsराष्ट्रिय

‘फादर्स डे’ चे गुगलचे खास डुडल !

नवी दिल्ली:  जगभरात आज ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येत असून, गुगलनंही डुडलच्या माध्यमातून हा खास दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. डुडलमध्ये गुगलने रंगीबेरंगी हातांचे सहा पंजे डायनासोरच्या रुपात दाखवले आहेत. या आधी ‘मदर्स डे’निमित्त गुगलने याच थीमवर आधारित डुडल तयार केले होते.

दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी जगभरात ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. या वर्षी १७ जूनला ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी १८ जूनला हा दिवस साजरा करण्यात आला होता. हा दिवस गेल्या १०८ वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button