breaking-newsराष्ट्रिय

प्रशांत भूषण यांच्या शिक्षेची उद्या सुनावणी

नवी दिल्ली – न्यायाधीश आणि न्यायपालिका यांचा अवमान केल्याप्रकरणीच्या खटल्यात दोषी ठरलेले ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांच्या शिक्षेची सुनावणी उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे ट्विट प्रशांत भूषण यांनी केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर हे वक्तव्य मागे घेण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत दिली होती. परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. तो उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशांत भूषण यांना समज देऊन सोडण्यात यावे, अशी मागणी ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी केली आहे. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button