breaking-newsराष्ट्रिय

पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या युवकाची जमावाकडून हत्या

उत्तर प्रदेशमधील शामली येथे पोलिसांसमक्ष हत्येचा प्रकार घडला. पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या युवकास खाली खेचून जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांसमक्ष हा प्रकार घडल्याचा आरोप पोलीस अधीक्षकांनी फेटाळला आहे.

ही घटना शामली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या झिंझाना परिसरातील हथछोया गावात घडली. येथील राजेंद्र कश्यप नावाच्या मुलाचा गावातील दुसऱ्या लोकांबरोबर वाद झाला होता. राजेंद्र हा नशेत होता, असे सांगण्यात येते. त्याचवेळी गावातील काही लोकांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर पोलीस राजेंद्र कश्यपला वाचवण्यासाठी घटनास्थळी आले. पोलिसांनी राजेंद्रला आपल्या ताब्यात घेतले.

मारहाणीनंतरही लोकांचा समूह शांत होत नव्हता. पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या राजेंद्रला बाहेर खेचून लोकांनी त्याला पुन्हा मारायला सुरुवात केली. या मारहाणीतच राजेंद्रचा मृत्यू झाला. परंतु, पोलिसांनी त्यावेळी तिथे उपस्थित नसल्याचे म्हटले आहे.

लोक एका व्हिडिओत राजेंद्रला मारहाण करत असताना दिसत आहेत. या घटनेत प्राथमिकदृष्टया पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे त्यावेळी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात विभागीय कारवाईचे आदेश दिल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी ट्विटरवरुन सांगितले.

पोलिसांच्या समोर राजेंद्र कश्यपचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताचे अजयकुमार यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, राजेंद्र पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. याचदरम्यान मारहाणीची घटना घडली आणि यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, व्हायरल व्हिडिओत राजेंद्र पोलीस व्हॅनमध्ये बसलेला दिसतो. तिथे पोलीस कर्मचारीही दिसतात. पोलीस उपस्थित असतानाही एक व्यक्ती राजेंद्रला मारहाण करताना दिसतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button