breaking-newsराष्ट्रिय

पोलिसांकडून पत्रकाराला कपडे काढून मारहाण, चेहऱ्यावरच केली लघुशंका

उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी जबर मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार रेल्वे रुळावरुन उतरलेल्या ट्रेनच्या तसंच रेल्वेत होणाऱ्या भ्रष्टाचाराची बातमी कव्हर करण्यासाठी गेला होता. पत्रकाराला मारहाण करत त्याला अमानवीय वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाण करणारे पोलीस कर्मचारी साध्या कपड्यांमध्ये होते. मारहाण केल्यानंतर पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं.

काय आहे प्रकरण ?
हे संपूर्ण प्रकरण शामली जिल्ह्यातील धीमानपुरा फाटकाजवळची आहे. रुळ बदलत असताना मालगाडीचे काही डबे रुळावरुन घसरले होते. ही घटना कव्हर करण्यासाठी पत्रकार अमित शर्मा घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे साध्या कपड्यांमध्ये हजर रेल्वे पोलिसांशी त्यांची कशावरुन तरी शाब्दिक चकमक उडाली. यानंतर एसआो जीआरपी राकेश कुमार यांनी शिव्या देत अमित शर्मा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर सहा पोलीस कर्मचाऱ्यांनीही अमित शर्मा यांच्यावर हात उचलला आणि जबर मारहाण केली. इतकंच नाही तर अमित शर्मा यांना जेलमध्ये बंद करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Embedded video

ANI UP

@ANINewsUP

Shamli: GRP personnel thrash a journalist who was covering the goods train derailment near Dhimanpura tonight. He says, “They were in plain clothes. One hit my camera&it fell down. When I picked it up they hit&abused me. I was locked up, stripped&they urinated in my mouth”

2,791 people are talking about this

आरोपींवर निलंबनाची कारवाई –
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी शामलीचे जीआरपी पोलीस निरीक्षक राकेश कुमार आणि एसएचओ संजय पवार यांना निलंबित केलं आहे. दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर पत्रकारांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

चेहऱ्यावर लघुशंका केल्याचा आरोप –
अमित शर्मा यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी मारहाण करण्यासोबतच जेलमध्ये चेहऱ्यावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. यावेळी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आल्याचाही आरोप आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button