breaking-newsराष्ट्रिय
पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी स्वस्त
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमध्ये कपात सुरु आहे. तीच कपात आजही पाहायला मिळाली. मुंबईत पेट्रोल ३० पैशांनी आणि डिझेल २१ पैशांनी स्वस्त झाले. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८५ रुपये २४ पैसे प्रति लिटर इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७ रुपये ४० पैसे इतका झाला आहे. दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अशीच कपात झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर ७९ रुपये ७५ पैसे प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेलचा दर ७३ रुपये ८५ पैसे प्रति लिटर इतका झाला आहे.
गेल्या १२ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात बघायला मिळते आहे. त्यामुळे ग्राहकांना आजही काही अंशी दिलासाच मिळाला आहे. दिवाळी तोंडावर आलेली असताना इंधन दर कपात होताना दिसते आहे त्यामुळे ही बाब नक्कीच समाधानाची म्हटली पाहिजे.