breaking-news

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ८ वर्षीय बालकाचा मृत्यू

औरंगाबाद | महाईन्यूज

ब्रिजवाडी येथील एका ८ वर्षीय बालकाचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( दि. २ ) पहाटे घडली. इमरान शेख सुलतान असे मृत बालकाचे नाव असून १० फेब्रुवारीस त्याच्यासह ७ जणांना कुत्र्याने चावा घेतला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारी रोजी ब्रीजवाडी येथील इमरान शेख सुलतान, अल्फिया सत्तार शेख, भागाजी नवतुरे यांच्यासह नारेगाव येथील चारजणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. यानंतर सर्वांवर वैद्यकीय उपचार सुरु होते. दरम्यान, इमरान शेख सुलतान यावर शासकीय रुग्णालय घाटी येथे इंजेक्शनचा डोस सुरु होता. त्याला सोमवारी चवथे इंजेक्शन देण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच रविवारी रात्री त्याची तब्येत अचानक खराब झाली आणि पहाटे ३ वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button