breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा; महिलेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा

बंगळुरू | महाईन्यूज

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आयोजित करण्यात आलेल्या सभेत गुरुवारी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देणाऱ्या एका तरुण महिलेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तिची कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले आहे. दरम्यान, या महिलेचे यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंध होते, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटलेले आहे.

या महिलेचे नाव अमूल्या लिओना असे असून तिला ‘सेव्ह कॉन्स्टिटय़ूशन’ सभेच्या आयोजकांनी गुरुवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत भाषणासाठी निमंत्रित केले होते, तेव्हा तिने पाकिस्तान समर्थनाच्या तीनदा घोषणा दिल्या. त्यानंतर तिला व्यासपीठावरून हुसकावून लावण्यात आले आणि तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तिला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता तिची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आपल्या कन्येने अक्षम्य चूक केली असल्याने कारवाई करावी, असे लिओनाच्या वडिलांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button