पाकिस्तानातून आयात करण्यात येणाऱ्या साखरेचे प्रमाण अत्यल्प
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sugar2-.jpg)
नवी दिल्ली : पाकिस्तानातून केल्या जाणाऱ्या साखर आयातीबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षात 14 मे 2018 पर्यंत पाकिस्तानातून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आली असून त्याची किंमत 0.657 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. 2017-18 या वर्षात पाकिस्तानातून 13 हजार 110 मेट्रिक टन साखर आयात करण्यात आली होती व त्याची किंमत 4.68 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती. भारत प्रामुख्याने ब्राझील कडूनच साखरेची आयात करतो. 2017-18 च्या गळीप हंगामात भारतात साखरेचे 31.90 मेट्रिक टन उत्पादन झाले. या वर्षभरातच भारताने 1.75 दशलक्ष टन साखरेची निर्यातही केली. एप्रिल-मे 2018 या दोनच महिन्यात साखरेची एकूण निर्यात 240.093 मे.ट. इतकी होती. म्हणजेच भारतातील साखरेचे एकूण उत्पादन व निर्यात यांच्या तुलनेत पाकिस्तानातून होणारी आयात फारच अत्यल्प आहे.