पाकिस्तानातील निवडणुकांवर सव्वाशे तृतीयपंथी लक्ष ठेवणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/3grampanchayatelection-.jpg)
इस्लामाबाद – पाकिस्तानात 25 जुलै रोजी होणाऱ्या निवडणूकांमधिल मतदान प्रक्रिया आणि मतदान कक्षांवर लक्ष ठेवण्यासाठी 125 तृतीयपंथींची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याकडे मतदान व इतर प्रक्रियेतील पारदर्शकता आणि व्यवस्था यांच्यावर लक्ष ठेवण्याचे महत्वपूर्ण काम देण्यात आले आहे.
ट्रस्ट फॉर डेमोक्रॅटिक एज्युकेशन अँड अकाऊंटेबिलिटी या एनजीओने निवडणूकीच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी काही लोकांना प्रशिक्षित केले आहे. त्यामध्ये या तृतीयपंथींचाही समावेश आहे. या सर्वांची लाहोर, कराची, इस्लामाबाद, क्वेट्टा या शहरांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक निरीक्षक म्हणून हे लोक कोठे मतदारांच्या अधिकारांचा संकोच होत असेल किंवा समाजातील अल्पसंख्यांकावर अन्याय होत असेल तर त्याची नोंद करतील. पाकिस्तानामध्ये तृतीयपंथींची 5 लाख इतकी संख्या असून 13 तृतीयपंथी ही निवडणूक लढवत आहेत.