पाकिस्तानमधूनही हद्दपार होणार व्हीआयपी कल्चर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pak-flag-1.jpg)
इस्लामाबाद – पाकिस्तानातील इम्रान खान सरकारने देशातील व्हीआयपी कल्चरही मोडित काढण्याचा निर्धार केला असून त्यासाठीच्या उपाययोजना त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यानुसार आता विमानतळांवर व्हीआयपींसाठी ठेवण्यात आलेला विशेष प्रोटोकॉल रद्द करण्यात आला आहे.
राजकारणी, न्यायाधिश, लष्करी अधिकारी यांना आता विमानतळावर व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाणार नाही. व्हीआयपींमुळे सामान्य प्रवाशांना दुय्यम वागणूक मिळते आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो तो याद्वारे नाहींसा होईल अशी सरकारची अपेक्षा आहे.
कोणत्याही सरकारी आधिकाऱ्याला किंवा व्हीआयपींला विमानतळावर कोणत्याही स्वरूपाचा वेगळा प्रोटोकॉल दिला जाऊ नये असा आदेश अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने फेडरल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीला दिला आहे. कोणत्याही व्हीआयपीला अशा स्वरूपाची व्हीआयपी ट्रिटमेंट विमानतळावर दिली गेल्याचे आढळल्यास संबंधीत व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशाराही यात देण्यात आला आहे.