Breaking-newsआंतरराष्ट्रीय
पाकिस्तानच्या मंत्र्यावर गोळीबार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/4bmu5c1b78f6bbndcs.jpg)
इस्लामाबाद – पाकिस्ताचे अंतर्गत व्यवहार मंत्री अशन इकबाल यांच्यावर पंजाब प्रांतातील नरोवाल भागात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यात त्यांच्या हातात गोळ्या घुसल्या असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापी त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी 20 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. ते सत्तारूढ मुस्लिम लीगचे नेते आहेत. ते आपल्या गावात जाहीर सभेसाठी गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा हा प्रकार घडला. पंजाबचे मुख्यमंत्री शहाबाज शरीफ यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला असून त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना यात जातीने लक्ष घालून तपास करण्यास सांगितले आहे.हल्ल्याचे नेमके कारण अजून समजू शकले नसून य प्रकरणाचा अन्य तपशील अजून मिळायचा आहे.