Breaking-newsराष्ट्रिय
पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 4 जवान शहीद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/army-1.jpg)
सांबा – पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवर बुधवारी पहाटे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकने सांबा येथे केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.
पाक सैन्याने सांबा जिल्ह्यातील रामगढ आणि चंबलीयाल या भागांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यात शहीद झालेल्या जवांनामध्ये बीएसएफचे 2 जवान, 1 असिस्टंट कमांडर आणि 1 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.