breaking-newsराष्ट्रिय

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार अद्यापही सुरु, गोळीबारात दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना येथे दोन गट आपापसांत भिडल्याने हिंसाचार झाला आहे. यावेळी हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला असून एका अल्पवयीनाचा समावेश आहे. हिंसाचारादरम्यान गोळीबार करण्यात आला, तसंच बॉम्बही फेकण्यात आले आहेत. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान परिसरात अद्यापही तणाव आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

मृतांमधील एकाचं नाव रामबाबू असून तो अल्पवयीन आहे. जखमी झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार करत, काही बॉम्बही फेकले. नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशनच्या शेजारीच हा सगळा प्रकार घडला. गुरुवारी या पोलीस स्टेशनचं उद्घाटन होणार होतं.

ANI

@ANI

West Bengal: In a clash between two groups of miscreants, crude bomb hurled, gun shots fired in Bhatpara; more details awaited.

26 people are talking about this

पोलीस अधिकाऱ्याचं एक पथक आणि शीघ्र कृती दल (Rapid Action Force) घटनास्थळी दाखल झाले आहेत. हिसाचारामुळे परिसरातील दुकानं, बाजार बंद करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच येथे हिंसाचार सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button