पवारांची गुगली अन् मोदींनी केलं कौतुक; नवनीत राणांची ‘ही’ मागणी पूर्ण होणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/navneet.jpg)
नवी दिल्ली:- राज्यातील सत्तास्थापनेचे पडसाद दिल्लीच्या राजकारणात उमटू लागले आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधी यांची राज्यातील परिस्थितीवर आज चर्चा होणार आहे. मात्र तत्पूर्वी घडलेल्या घडामोडीतून महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याचदरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपती राजवटीला सर्वस्वी शिवसेना जबाबदार असल्याचं सांगत राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येत सरकार स्थापन करावं असं विधान केलं आहे.
याबाबत बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना कौल दिला आहे त्यांनी सरकार बनवायला हवं होतं. शिवसेना-भाजपा महायुतीला कौल दिला आहे. मात्र राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच सत्तास्थापनेचा घोळ निर्माण झाला आहे. निम्म्या जागा असताना मुख्यमंत्रिपद मागणं चुकीचं आहे. त्यांच्यामुळेच राज्यावर राष्ट्रपती राजवट सुरु आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यास अडचण निर्माण होत आहे असं त्यांनी सांगितले.