पतीनं कॉलगर्ल बोलावली, पण ती त्याचीच पत्नी निघाली
![Exposed prostitution under the name of Spa Center at Hinjewadi IT Park](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Sex-rackeT-Frame-copy-2.jpg)
काशीपूर | महाईन्यूज
पती-पत्नीचा संसार विश्वासाच्या नात्यावर टिकून आहे, असे बोलले जाते ते उगीच नाही. पतीने पत्नीला धोका देण्याचा प्रयत्न केला तर पतीच्या माघारी वेश्या व्यवसाय करणाऱ्या पत्नीचा खरा चेहरा पतीसमोर उघड झाल्यानंतर काय परिस्थिती उद्भवली असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये हा प्रकार नुकताच समोर आला आहे. एका पतीने व्हॉट्सअपवरून कॉलगर्ल बोलावली खरी परंतु, कॉलगर्ल म्हणून बोलावलेली तरुणी स्वतःची बायको निघाली आहे. यानंतर हॉटेलमध्ये दोघा पती-पत्नीमध्ये चांगलाच तुफान राडा झाला. दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे.
काशीमधील दिनेशपूर गावात राहणाऱ्या एका तरुणाचे काशीपूरच्या आयटीआय परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत लग्न झाले होते. परंतु, लग्नानंतर ही तरूणी पतीसोबत न राहता माहेरी राहत होती. पत्नी सासरी कमी आणि माहेरी जास्त राहत होती. पत्नी सासरी राहत नसल्याने हा तरूण चिंतेत होता. याच वेळी पत्नीच्या मैत्रिणीने त्याला सांगितले की, त्याची पत्नी कॉलगर्लचे काम करते. पत्नी व तिच्या मैत्रिणीमध्ये भांडण झाल्याने तिने पतीला तिचा कारनामा सांगितला. इतकच नव्हे तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलाल महिलेचा मोबाइल नंबर दिला. त्यानंतर पतीने श्यामपूरम मध्ये राहणाऱ्या एका महिला दलालाशी व्हॉट्सअपवरून संपर्क साधला. त्यानंतर त्या दलाल महिलेने महिलांचे काही फोटो व्हॉट्सअपवर पाठवले. व त्या फोटोमधून एका तरुणीची निवड करण्यास सांगितले. या तरुणाने पत्नीच्या फोटोची निवड केली. त्यानंतर कॉलगर्लला एका हॉटेलात येणास सांगितले. हॉटेलचा पत्ता दलाल महिलेला पाठवला होता. दलाल महिलेने त्या तरुणीला हॉटेलात पाठवले व कॉलगर्ल म्हणून पत्नी ज्यावेळी पतीसमोर आली तेव्हा त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आहे. हाणामारीही झाली अन दोघा पती-पत्नीचा वाद पोलिस स्टेशनला पोहोचला. दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.