breaking-newsआंतरराष्टीय

पंतप्रधान मोदी आणि शिंजो अबे यांची गळाभेट, दोन्ही देशांमध्ये नवा अध्यायाची होणार सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची गळाभेट घेतली. भारत-जपान परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारीच जपानची राजधानी टोकियो येथे पोहोचले होते. यामानाशीच्या माउंट फुजी या हॉटेलमध्ये पोहोचल्यावर अबे यांनी मोदींचं स्वागत केलं, दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

ANI

@ANI

: Japan Prime Minister Shinzo Abe receives PM Narendra Modi at hotel Mount Fuji in Yamanashi

यापूर्वी शनिवारी टोकियो येथे पोहोचल्यानंतर जपानमधील भारतीयांनी पंतप्रधान मोदींचं उत्साहात स्वागत केलं होतं. अबे यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांमध्ये नवा अध्याय जोडला जाईल असं मोदी टोकियोत पोहोचल्यावर म्हणाले होते. या भेटीत अबे यांच्यासोबत चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हिंदी महासागरातील चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी जपानसह अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने आघाडी केली आहे. यामुळे चीनच्या मनसुब्यांना रोखण्यासाठी रणनिती आखण्यात येण्याची शक्यता आहे.

28 आणि 29 ऑक्टोबर रोजी भारत-जपान ही परिषद होणार आहे. आर्थिक आणि तांत्रिक विकासामध्ये जपान हा भारताचा सर्वात विश्वासू भागीदार असल्याचे मोदी यांनी जपान दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले. देशाने मागील काही काळापासून भारताने लूक ईस्ट धोरण अवलंबलेले आहे. त्याच्या परिणामी पूर्वेकडील बहुतांश देशांसोबतच्या संबंधात सुधारणा झाली आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्र मुक्त, खुले आणि विस्तृत होण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये सर्वप्रथम जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांची अबे यांच्यासोबत होत असलेली बारावी भेट आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button