breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींनी मला धडा शिकवला : राहुल गांधी

”मी काल माझ्या आईसोबत(सोनिया गांधी) बोलत असताना तिला म्हणालो की, माझ्यासाठी आतापर्यंत सर्वात चांगली गोष्ट कोणती घडली असेल ती म्हणजे 2014 ची लोकसभा निवडणूक…तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल मी काय बोलतोय पण हे खरंय….मी त्या निवडणुकांमधून खूप काही शिकलो…कशाप्रकारे विचार करावा हे मी शिकलो आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे विनयशीलता शिकलो…हा महान देश आहे या देशातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या देशातील जनता…आणि राजकारणी म्हणून जनतेला काय वाटतं हे तुम्हाला कळायला पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे. अगदी मोकळेपणाने सांगायचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला धडा शिकवला…मोदींमुळे मला काय करु नये हे समजलं…तुम्ही जरा मागे बघाल तर 2014 मध्ये प्रचंड मोठा जनादेश देऊन जनतेने मोदींना सत्तेत आणलं, देशात बदल घडवण्यासाठी जनतेने त्यांना सत्ता दिली होती. विरोधक असूनही मला वाईट वाटतंय की त्यांनी या देशातील नागरीकांच्या मनात काय आहे हे ऐकण्यास स्पष्ट नकार दिला, देशातील तरुणवर्ग काय बोलतोय, त्यांचं म्हणणं काय आहे हे त्यांनी कधी ऐकलं नाही, शेतकऱ्यांच्या समस्याही कधीच जाणून घेतल्या नाहीत…एकप्रकारचा अहंकार त्यांच्यात निर्माण झाला आणि अहंकार निर्माण होणं राजकारणात घातक ठरतं…त्यांच्या अशाप्रकारच्या वागण्यातून खूप काही शिकलो. पण माझ्यासाठी देशाची जनता हीच सर्वात मोठी शिक्षक आहे…तुम्ही या देशातील अगदी कोणाशीही बोला, तुम्ही शेतकऱ्यांशी बोला किंवा एखाद्या व्यापाऱ्याशी बोला ते नवनवं काहीतरी सांगत असतात. या देशात खूप जास्त समजदारपणा आहे. खूप काही शिकलोय…2014 पासून आजपर्यंतचा प्रवास चांगला होता… अनेकदा धक्केही बसले…पण ती चांगलीच गोष्ट आहे”. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पुन्हा उदय झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.

भाजपाला आम्ही आज हरवलं आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही भाजपाला हरवणार आहोत. मात्र कुणाला भारतातून मुक्त करण्याची, कुणाचे नामोनिशाण मिटवण्याची भाषा आम्ही करणार नाही, असा सणसणीत टोला राहुल यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपाला लगावला. तसंच 2019 मध्ये रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या हाच आमचा मुख्य मुद्दा असेल. याशिवाय राफेल, नोटबंदी, जीएसटी हे देखील मुद्दे असतील असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस निवडणुका जिंकली म्हणून इव्हीएमचा प्रश्न संपत नाही. कारण हा प्रश्न केवळ भारतातच नाही तर जागतिक स्थरावरही आहे, असंही ते म्हणाले. तसंच जेव्हा मोदी जिंकले तेव्हा रोजगार, भ्रष्टाचार आणि शेतकरी समस्या हे मुख्य मुद्दे होते. मोदी खरंच भ्रष्टाचाराविरोधात लढतील असं जनतेला वाटत होतं, मात्र आता मोदी स्वतःच भ्रष्ट आहेत असं जनतेला वाटतंय. नोटबंदी हा प्रचंड मोठा घोटाळा होता आणि राफेलमध्येही भ्रष्टाचार झालाय हे सत्य आहे व सत्य लवकरच बाहेर येईलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज देशातले सगळे प्रश्न जैसे थे आहेत. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तिन्ही प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच नोटाबंदी, जीएसटी या संदर्भातले निर्णय जनतेला पटलेले नाहीत. जनतेचा रोषच मतपेटीतून व्यक्त झाला आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला भाजपामुक्त भारत करायचा नाही या वक्तव्याचाही त्यांनी पुनरूच्चार केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button