breaking-newsराष्ट्रिय
पंतप्रधान पुन्हा जाणार विदेश दौऱ्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/narendra-modi-4.jpg)
नवी दिल्ली – सततच्या विदेश दौऱ्यांमुळे विरोधकांच्या टिकेचे धनी बनलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात पुन्हा विदेश दौऱ्यावर जात आहेत. यावेळी ते अफ्रिकेतील रवांडा, युगांडा आणि दक्षिण अफ्रिका या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. 23 जुलै ते 27 जुलै असे चार दिवस ते विदेश दौऱ्यावर जाणार आहेत.
दक्षिण अफ्रिकेत ब्रिक्स देशांची बैठक होत आहे. त्यानिमीत्ताने ते युगांडा आणि रवांडा या अफ्रिकेतील मागास देशांचाही दौरा करणार आहेत. ब्रिक्स देशांच्या परिषदेत ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण अफ्रिका या देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होत आहे.