breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ७५ हजार कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ होणार आहे. जवळपास एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर आणखी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवसांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारने २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये सदर योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टर जमीन असलेल्या १२ कोटी छोटय़ा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हप्त्यांत वर्षांला सहा हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. सदर योजना चालू आर्थिक वर्षांपासून अमलात आणण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता मार्चपूर्वीच मिळणार आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह १४ राज्यांमधील शेतकऱ्यांना रविवारी पहिला हप्ता मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button