पंतप्रधानांच्या सौदी दौऱ्यासाठी पाककडून हवाई हद्द खुली करण्यास नकार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यामुळे इथे जाण्यासाठी भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करावा लागणार अन्यथा दुसऱ्या मार्गाने जावे लागणार आहे. त्यामुळे मोदींच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी पाकिस्तान हवाई हद्दितील मार्ग वापरण्याची भारताने मागितलेली परवनागी पाकने नाकारली आहे.
पाकिस्तानी वृत्तानुसार पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद यासंदर्भात भारताचे उच्चायुक्तांना लेखी कळवणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, जम्मू काश्मीरमधील मानवाधिकाराचे उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान हवाई हद्दीतून जाण्यासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात आली आहे.
मोदी 28 ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या सौदी अरबिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सौदीचे पंतप्रधानांची भेट घेणार असून तेल, गॅस यासह काही महत्त्वपूर्ण प्रकल्पासंदर्भात दोन्ही देशाच्या पंतप्रधानाची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटी दरम्यान दोन्ही नेते काही करारांवर देखील स्वाक्षऱ्या करणार आहेत.
यापूर्वी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केकला जाताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणे टाळले होते. पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्यास पाक सरकारने परवानगी दिली असताना मोदींनी लांब पल्ल्याच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला होता. नरेंद्र मोदी यांना बिश्केकला घेऊन जाणारे विमान ओमान, इराण या मार्गाने जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.