breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

पंढरीतील विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात १ लाख वारकऱ्यांचे आंदोलन

पंढरपूर – यापूर्वी दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचे आंदोलन सर्वश्रुत आहे तर सर्व धर्मियांना प्रवेश देण्यासाठी विनोबा भावे यांचेही आंदोलन जनता विसरलेली नाही. आता मात्र कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना १ लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार असल्याने याचा धसका प्रशासनाने घेतला असल्याचे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे म्हणाले.

वास्तविक वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणाऱ्या आंबेडकरांकडे याचे नेतृत्त्व आल्याने आंदोलनाचे महत्त्व वाढले आहे. कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजपासोबत असलेला वारकरी वंचितकडे गेल्याने विचारांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिर ३१ ऑगस्टपर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे २ लाख वारकरी येतील असा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button