breaking-news

पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण

पंढरपूर – लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची बाधा झाली, तेव्हापासून त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण अस्वस्थ आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कोणी देवाला नवस केले आहेत तर कोणी व्रत उपासना सुरु केले आहेत. अनेकांच्या मनात देवाच्या जागी सुधाकरपंत परिचारक यांना स्थान आहे. सुधाकरपंत परिचारक यांचे नातू आणि प्रशांत परिचारक यांचे पुत्र प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवर ही भावनिक पोस्ट केली आहे.

“गेल्या पन्नास वर्षापासून ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता, ते ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे” असे आवाहन नातू प्रितीश प्रशांत परिचारक यांनी केले आहे. ८५ वर्षीय सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

सुधाकरपंत परिचारक यांनी २०१९ मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button