breaking-newsआंतरराष्टीय
न्यू जर्सीमध्ये गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू
महाईन्यूज | वॉशिंग्टन
अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना न्यू जर्सी शहरातील बेव्यू भागात असेल्या एका दुकानाच्या बाहेर घडली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेव्यू आणि मार्टिन ल्यूथर किंग रोडजवळ दुपारी झालेल्या गोळीबारानंतर परिसरात अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच, यावेळी येथील शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा मोठ्याप्रमाणात वाढविण्यात आली आहे.