Breaking-newsआंतरराष्ट्रीय
न्यूयॉर्कमधील आरोग्य आयुक्तपदी भारतीय वंशाचा डॉक्टर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/doctar-dave.jpeg)
न्यूयॉर्क – अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील आरोग्य आयुक्तपदी भारतीय वंशाच्या डॉ. दवे ए. चोकशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली आहे. डॉ. ऑक्सीरिस बार्बोट यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. डॉ. चोकशी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे.
सध्याच्या कोरोना महामारीच्या आव्हानांचा सामना करतानाही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यामुळेच ३९ वषीय डॉ. दवे चोकशी यांची न्यूयॉर्क शहराच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड मेंटल हायजिनचे आयुक्त म्हणून वर्णी लावण्यात येत असल्याची स्पष्टोक्ती महापौरांनी दिली आहे. २०१६मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सार्वजनिक आरोग्यविषयक सल्लागार समूहात डॉ. दवे चोकशी यांचा समावेश केला होता.