breaking-newsआंतरराष्टीय
न्यूझीलंड पंतप्रधान जसिंडा आर्डेम पंतप्रधानपदी असताना बालकाला दिला जन्म
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/jacindra-ardern.jpg)
बालकाला दिला जन्म
ऑकलंड, (न्यूझीलंड) – न्यूझीलंडच्या जसिंडा आर्डेम (37) यांनी पंतप्रधानपदी असताना एका कन्येला जन्म दिला आहे. पंतप्रधानपदी असताना माता बनणाऱ्या जसिंडा आर्डेम या जगातील दुसऱ्या पंतप्रधान आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो या पंतप्रधानपदी असताना प्रसूत झाल्या होत्या.
पालक बनल्यानंतर येणाऱ्या भावनांचा आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनी दिलेले प्रेम आणि दाखवलेला जिव्हाळा या बद्दल मी आपणा सर्वांची अत्यंत आभारी आहे, (37) असे पंतप्रधान जसिंडा आर्डेम यांनी ट्विट करून स्पष्ट केले केले.