breaking-newsआंतरराष्टीय

न्यूझीलंडच्या मशिदींवरील हल्लेखोर माथेफिरूला जन्मठेप

क्राईस्टचर्च – न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमधील दोन मशिदींवर १५ मार्च २०१९ रोजी अंदाधुंद गोळीबार करणारा ऑस्ट्रेलियाचा माथेफिरू तरुण ब्रेंटन टैरेंट याला येथील उच्च न्यायालयाने दोषी ठरवून विनापॅरोल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मशिदीवरील या गोळीबारात ५१ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४० हून अधिक जण जखमी झाले होते.

क्राईस्टचर्च हायकोर्टाचे न्यायाधीश केमरून मेंडर यांनी ही शिक्षा सुनावली असून न्यूझीलंडच्या इतिहासात प्रथमत एखाद्या आरोपीला विनापॅरोलची जन्मठेप झाली आहे. त्यामुळे त्याला आयुष्यभर तुरुंगात रहावे लागणार आहे. न्यूझीलँड हा मानवतावादी देश आहे. असे असताना केवळ हत्याकांडाच्या हेतूने ब्रेंटन ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडमध्ये आला होता. हेही स्पष्ट होते, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे. एकंदर ८२ केसेसमध्ये त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीत हा खटला निकालात काढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button