Breaking-newsराष्ट्रिय
नाच करत वाहतूक नियंत्रणात ठेवणारा पोलीस पाहिलात का?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Police.jpg)
वाहतूक पोलीस म्हणजे ‘मामा’ असा प्रचलित शब्द आहे. रस्त्यावरची वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे काम हे पोलीस करत आस करत असतात. मात्र तुम्ही कधी नाच करत वाहतूक नियंत्रणात ठेवणारा पोलीस पाहिला आहे का? नाही ना. ओदिशातील भुवनेश्वरमध्ये प्रतापचंद्र खंडवाल याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. प्रतापचंद्र हा पोलीस रस्त्यावर आपली नृत्यकला दाखवत ट्रॅफिक कंट्रोल करतो आहे. हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
पाहा व्हिडिओ
लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यांनी ते पाळावेत म्हणून माझ्या ‘डान्स स्टेप्स’मधून लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश देतो आहे. माझी ही पद्धत लोकांना वाहतूक नियम पाळण्यास प्रोत्साहन देईल असेही या पोलिसाने म्हटले आहे.