breaking-newsविदर्भ

नागपूरच्या महापौरांची यापुढे निवडणूक न लढण्याची घोषणा

नागपूर – महापौर संदीप जोशी यांनी काल वाढदिवसानिमित्त फेसबुक लाईव्हद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी एका कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली.

‘आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?’, असा सवाल एका कार्यकर्त्याने संदीप जोशी यांना फेसबुक लाईव्हदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.

‘अनेकदा नेत्यांनीच लढायचे आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचे हे बरोबर नाही. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतोय की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही’, असे संदीप जोशी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button