Breaking-news
नागपुरातील सेव्हन स्टार रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/7-star-hospital.jpg)
नागपूर – नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने शहरातील सेव्हन स्टार रुग्णालयाविरोधात पालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून शासन नियमाव्यतिरिक्त जादा बील आकारल्याने सेव्हन स्टार या रुग्णालयाला हे बिल परत करण्याचे आदेश पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते. मात्र या आदेशाला रुग्णालय व्यवस्थापनाने जुमानले नाही. त्यामुळे अखेर या सेव्हन स्टार रुग्णालयाविरोधात नंदनवन पोलीस ठाण्यात पालिका प्रशासनाने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.