breaking-newsराष्ट्रिय

नरेंद्र मोदी पंतप्रधानांसारखे वागा, चहावाल्यासारखे नाही-ओवेसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक गोष्टीत चहा आणतात. कडक चहा, नरम चहा, चहापत्ती, निर्णय घेतला की चहाचा विषय. चर्चा करायची असेल तर चहाचा विषय अरे तुम्ही चहावाले होतात. आता पंतप्रधान आहात पंतप्रधानांसारखे वागा चहावाल्यासारखे वागू नका असा खोचक सल्ला एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. तसेच हे पंतप्रधान आहेत की कोण आहेत? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. हैदराबादमधल्या एका रॅलीमध्ये बोलताना एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Embedded video

ANI

@ANI

Akbaruddin Owaisi, AIMIM in Hyderabad: Baat karein ki ‘chai chai chai, chai. Har waqt vahi, demonetisation. Ye chai, vo chai, kadak chai, naram chai. Ye Wazir-e-Azam hain ya kya hain? Arey chaiwala tha, ab Wazir-e-Azam hai. Wazir-e-Azam jaisa ban jao. (02.12.2018)

287 people are talking about this

याआधी असदुद्दीन ओवेसी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा निशाणा साधला आहे. आता त्यांच्या भावानेही म्हणजेच अकबरूद्दीन ओवेसीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम त्यांच्या भाषणामध्ये मी चहावाला होतो. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला याचा विरोधकांना त्रास होतो. ‘चायपे चर्चा’चे उदाहरणही ते देतात. आता याच सगळ्या मुद्द्यांवरून अकबरूद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हैदराबाद या ठिकाणी झालेल्या रॅलीमध्ये ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button