breaking-newsआंतरराष्टीय

नमाज अदा करणाऱ्या चौघांची अफगाणिस्तानात हत्या

काबुल (अफगाणिस्तान) – नमाज अदा करणाऱ्या चौघांची अफगाणिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या पूर्व खोस्त प्रांतातील मांदो जई जिल्ह्यात बुधवारी दुपारी ही घटना घडल्याची माहिती पूर्व खोस्त प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते तालिब मंगल यांनी दिली आहे.

बुधवारी दुपारी मशिदीत 15 लोक नमाज अदा करत होते. त्या वेळी एका मोटर कारमधून आलेल्या बंदुकधारीं हल्लेखोरांनी कारमध्ये बसूनच मशिदीत गोळीबार केला. यात चार जण ठार झाले असून आणि तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेचा पोलीस तपास करत सून अद्याप कोणालही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलीस प्रवक्‍ते बशीर बेईना यांनी सांगितले.

कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हल्ला झाला त्यावेळी मशिदीत कोणी अधिकारी नमाज अदा करत होता किंवा नाही, हे समजलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button