breaking-newsराष्ट्रिय

ध्वजारोहण करतानाच काँग्रेस नेत्यांची हाणामारी!

इंदूर – देशात सर्वत्र आज उत्साहाने 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात येत आहे. या निमित्ताने इंदूरमधील मध्य प्रदेश काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातही तिरंगा फडकविण्यात आला. मात्र, ध्वजारोहणाच्या वेळी पक्षाच्या नेत्यांमध्येच हाणामारी झाली. हा वाद वाढत गेल्यानंतर इतर कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, त्यानंतर दोघांना शांत करण्यात यश आले.

वास्तविक मुख्यमंत्री कमलनाथ इंदूरमधील काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण करणार होते. ध्वजारोहणाच्या वेळी पक्षाचे दोन नेते देवेंद्रसिंह यादव आणि चंदू कुंजीर यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

कमलनाथ हे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही आहेत. गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात तिरंगा फडकल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, जे लोक देशाच्या संस्कृती आणि राज्यघटनेच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतात त्यांचा तीव्र विरोध केला जाईल. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात देशाच्या विविध भागात निषेध सुरू असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button