धावत्या गाडीमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Car-Rape-.jpg)
तरुणीचे अपहरण करुन धावत्या गाडीमध्ये तिघांनी मिळून तिच्यावर सामूहीक बलात्कार केला. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात मागच्या शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. गुन्हा घडला त्याचदिवशी तक्रार नोंदवण्यात आली. पण अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित मुलगी कॉलेजच्या दुसऱ्यावर्षाला असून ती कोचिंग क्लासला जात असताना तिघांनी तिचे अपहरण केले व तिला गाडीत बसवले.
पीडित तरुणीचे डोळे बांधून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सकाळी १० च्या सुमारास त्यांनी पीडित मुलीला गाडीतून उतरवले. याबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा आरोपींनी पीडित मुलीला दिली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी रस्त्यावर फार लोक नव्हते. पीडित तरुणीने आरोपींची नावे ओळखली आहेत. दोन आरोपी जवळच्याच गावातील आहेत. पीडित मुलीने गुन्हा घडला त्याचदिवशी तक्रार नोंदवली. पण न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडित तरुणीची जबानी नोंदवता आली नाही.
मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून आयपीसीच्या कलम ३७६ डी अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपास सुरु असून अजून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्यामध्ये ज्या कारचा वापर झाला ती शोधून काढण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.