धक्कादायक! पार्टीला बोलावून अल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या
![Shocking! … Constable rapes woman in Gujarat for not wearing mask](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Rape.jpg)
तेजपूर | महाईन्यूज
आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यात एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या सात विद्यार्थ्यांना रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. या विद्यार्थ्यांनी नुकतीच १०वीची बोर्डाची परीक्षा दिलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलांनी मुलीला झाडाला लटकवून गळफास लावला आणि हत्या केली. ही घटना शुक्रवारी चाकला गावात घडली आहे. गोहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकला गावात शुक्रवारी १२ वर्षीय मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि जंगलात नेऊन झाडावर लटकावून गळफास लावला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. रविवारी पोलिसांच्या पथकाने या सर्व सात दहावीच्या परीक्षार्थींना पकडले आहे. परीक्षेनंतर आरोपीने पीडित मुलीला घरी पार्टीच्या बहाण्याने बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. शुक्रवारी रात्री मुलीवर बलात्कार केल्याचा संशय आहे आणि त्यानंतर घराजवळ जंगलातील झाडावर तिला लटकविण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. शनिवारी पीडित मुलीचा मृतदेह सापडला आहे.