breaking-newsराष्ट्रिय

दोन लाख भाविकांनी घेतले अमरनाथ दर्शन

जम्मू – काश्‍मीरात सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेत गेल्या 33 दिवसांत आत्तापर्यंत एकूण दोन लाख भाविकांनी अमरनाथनचे दर्शन घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इतक्‍या कमी दिवसांत इतक्‍या मोठ्याप्रमाणात भाविकांनी दर्शन घेण्याचा गेल्या तीन वर्षातील हा पहिलाच प्रसंग आहे.

गेल्या वर्षी संपुर्ण अमरनाथ यात्रेत एकूण 2 लाख 62 हजार 314 यात्रेकरूंनी अमरनाथचे दर्शन घेतले होते यंदा हा आकडा 33 व्या दिवशीच पार केला गेला आहे. अमरनाथ यात्रेकरूंचा आत्ता पर्यंतचा सर्वात अधिक विक्रम 2014 साली नोंदवला गेला होता, त्यावर्षी एकूण 3 लाख 72 हजार यात्रेकरूंनी अमरनाथचे दर्शन घेतले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button