Breaking-newsराष्ट्रिय

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सात लाखाच्या जवळ

मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २४,२४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यामध्ये ४२५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जाहीर केलेल्या अपडेटनुसार, देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ६ लाख ९७ हजार ९१३ इतका पोहोचला आहे. तर यामध्ये मृतांचा आकडा हा १९ हजार ६९३ इतका आहे. 

आतापर्यंत ४ लाख २४ हजार ४३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २४ तासांत १५ हजार ३५० रूग्णांनी कोरोनाशी दोन हात केले आहे. देशात ऍक्टिव केसची संख्या २ लाख ५३ हजार २८७ इतकी आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, ५ जुलैपर्यंत ९९ लाख ६९ हजार ६६२ लोकांची स्लॅब टेस्ट करण्यात आली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button