breaking-newsराष्ट्रिय

#Coronolockdown:दुकाने उघडण्याचा निर्णय राज्ये घेतील- केंद्र निर्देश संदिग्ध, सोमवारनंतर ठरवू : महाराष्ट्र

नवी दिल्ली. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा देत हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनबाहेरील मोबाइल फोन, स्टेशनरी, गारमेंट्स, हार्डवेअर आदींची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. शॉपिंग मॉल्समधील दुकाने मात्र बंद राहतील. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेली ही सवलत सलून, स्पा, रेस्टॉरंट आणि दारूच्या दुकांनासाठी लागू नसेल. ही दुकाने ३ मेपर्यंत बंदच राहतील. केंद्राकडून शुक्रवारी रात्री जारी आदेशामुळे कोणती दुकाने सुरू ठेवायची, कोणती बंद करायची याबाबत राज्य सरकार आणि दुकानदारांत संभ्रम होता. त्यानंतर शनिवारी गृह मंत्रालयांने स्पष्टीकरण जारी केले.


राज्यांना गृह मंत्रालयाचे आदेश पूर्णपणे लागू करावे लागतील. ते शिथिल करता येणार नाहीत. सुधारित आदेशानुसार ग्रामीण आणि शहरी क्षेत्रांतील गल्ली, अनिवासी परिसर, कॉलनीच्या जवळची आणि एकेकटी (स्टँड अलोन) असलेली दुकाने सुरू ठे‌वण्याची परवानगी राहील. गृह मंत्रालयाने दुकाने सुरू ठे‌वण्यासाठी काही अटी घातल्या आहेत, जसे दुकानांत ५०%स्टाफच असावा. या सर्वांनी मास्क लावणे व सोशल िडस्टन्सिंगचे पालन करणे आ‌वश्यक आहे. राज्यांना या नियमांत बदल करता येणार नाही.


४ मुद्द्यांतून समजून घ्या सरकारचे आदेश

– ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकाने सुरू राहतील. तीच दुकाने सुरू राहतील, जेथे किराणा सामान विक्री होते.
– शहरी क्षेत्रातील निवासी भागात कॉलनीतील, त्याच्या आसपासची दुकाने सुरू राहतील.

– अटींसह दुकाने सुरू ठेवण्यास मुभा. ५०% स्टाफ कामावर येईल.सर्वांनी मास्क लावावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे.

– राज्यातील शॉप्स अॅक्टनुसार नोंदणीकृत सर्व दुकांनाना ही सवलत देण्यात आली आहे.


सेवा नव्हे, फक्त सामान विक्रीस सूट

– सलून, केशकर्तनालय दुकाने बंदच राहतील, कारण ते सेवादात्यांच्या श्रेणीत येतात.

– दारू, सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांची विक्री पूर्वीप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी बंदच राहील.

– ई-कॉमर्सअंतर्गत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल, इतर सर्वांवर निर्बंध असतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button