दीपिका-रणवीरच्या लग्नाची तारीख निश्चित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/deepika-and-ranveer.jpg)
बॉलीवूडमध्ये सध्या अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कूपरच्या लग्नाची गरमागरम चर्चा सुरू आहे. बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत ती 8 मे रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. यासोबत बॉलीवुडमधील आणखी एक लव्हबर्डस् विवाह करणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत.
रणवीर आणि दीपिका या दोघा कुटुंबातील सदस्यांमध्ये लग्नाबाबत बैठक झाली आहे. या बैठकीत नोव्हेंबरमधील तारीख निश्चित झाल्याचे समजते. या महिन्यातच दोघे एकत्रित येणार आहेत. तसेच रणवीर आणि दीपिका यांनी आपआपल्या टीममधील सदस्यांनाही या महिन्यात सुटी घेण्यास मनाई केली आहे आणि प्रत्येकाला लग्नात सहभागी होण्यास सांगितले आहे. मात्र, दोघांनीही लग्नाबाबत अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, जीममधील दीपिकाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. रणवीरसोबतच्या संबंधामुळे या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. या फोटोत दीपिका आपल्या मानेवरील टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते. हा टॅटू तिने रणवीरसोबत अफेअर असतानाच्या वेळी बनविला होता. हा फोटो दीपिकाच्या एका फॅन क्लबने ट्विटरवर शेअर केला आहे.