breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीत राजकीय तणाव वाढला; ‘आप’कडून पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव

नवी दिल्ली : दिल्लीत सलग सात दिवस धरणे आंदोलन करणाऱ्या आम आदमी पक्षाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी कूच केली. मंडी हाऊसमधून निघालेल्या या मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनेही पाठिंबा दर्शवला आहे. या मोर्चामध्ये माकपचे सिताराम येचुरीही सामील झाले आहे.

केंद्र सरकारच्या दबावामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्ली सरकारशी असहकार पुकारल्याचा आरोप करत नायब राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी केजरीवाल यांनी 7 दिवसांपासन त्यांच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडली आहे. पण त्यानंतरही दखल न घेतल्यानं आम आदमी पक्षानं थेट पंतप्रधानांच्या निवासाला घेराव घालण्याची तयारी केली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांची बाजू आज थेट पंतप्रधानांसमोर मांडली. नीती आयोगाच्या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांची आज भेट घेतली.

काल रात्री या चौघांनीही अरविंद केजरीवाल यांच्या ठिय्या आंदोलनाला भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना प्रशासनाने भेट नाकारली होती. त्याबद्दलची नाराजीही आज त्यांनी पंतप्रधानांसमोर मांडल्याचं कळतं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button