Breaking-newsराष्ट्रिय
दिल्लीत एकाच घरात आढळले 11 मृतदेह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/police-61.jpg)
नवी दिल्ली – राजधानीतील बुरारी भागातील एकाच घरात 11 जणांचे मृतदेह आढळले आहेत. यामध्ये 7 मृतदेह महिलांचे तर 4 पुरुषांचे आहेत. ही हत्या आहे, की सामुहिक आत्महत्या हे अजूनही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घरात आढळलेल्या 10 मृतदेहांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधलेल्या आढळून आल्या आहेत. हे सर्व मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या स्थितीत होते. तर एक मृतदेह जमिनीवर पडलेला आढळून आला आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.