दिनेश डिसुझाला क्षमा केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/trump-dsouza.jpg)
वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाचे समालोचक दिनेश डिसुझा यांना क्षमा करून त्यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केला होता. तथापि याबद्दल त्यांच्यावर टीकेचा भडिमार समाजमाध्यमातून करण्यात येत आहे.
न्यूयॉर्कचे महाअभिव्यक्ता बार्बरा अंडरवूड यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली. या क्षमादानामुळे न्यायव्यवस्थेवर अन्याय झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केला आहे. अमेरिकेच्या प्रचारविषयक आणि जाहिरातविषयक कायद्याचा भंग केल्यामुळे दिनेश डिसुझा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कायद्याचा भंग हा अमेरिकेत गंभीर गुन्हा समजला जातो. डिसुझा हे ट्रम्प यांचे समर्थक असल्यामुळे त्यांना झुकते माप देण्याचा आरोप करण्यात येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि डिसुझा यांची प्रत्यक्ष भेट अद्यापपर्यंत झालेली नाही. तथापि डिसुझा हे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असल्याचे मानण्यात येते. ट्रम्प यांनी त्यांना यापूर्वीही अभयदान दिले होते. ट्रम्प यांच्या या निर्णयाला डेमोकेटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी विरोदा दर्शविला आहे.