breaking-newsआंतरराष्टीय

तुर्कीतील भीषण रेल्वे अपघातात 24 ठार शेकडो जखमी

इस्तंबूल (तुर्की) – तुर्कीतील भीषण रेल्वे अपघातात 24 प्रवासी मरण पावले असून शेकडो जखमी झाले आहेत. उत्तर-पश्‍चिम तुर्कीत एक रेल्वे रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आणि रुळांचा आधार गेल्याने रूळ उखडून रेल्वे सहा डब्यांसह रुळावरून घसरली. तुर्कीचे उप पंतप्रधान रेसिप अकदाग यांनी रेल्वे अपघाताच्या वृत्ताची पुष्टी केली असून मदत कार्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. मदतीसाठी 100 पेक्षा अधिक अँब्युलन्स पाठवल्या असून आवश्‍यकता पडल्याचे हेलिकॉप्टर पाठवण्याची तयारी करण्यात आलेली आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखला केले आहे.

एकूण 338 जणांना उपचारासाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 124 प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आल्याची माहिती तुर्कीचे आरोग्य मंत्री अहमद डेमिर्कान यांनी दिली आहे.

बल्गेरियन सीमेवरील कापिकुल या शहराहून ही रेल्वे रविवारी इस्तंबूलला जात होती. दोन दिवसांच्या सुटीमुळे प्रचंड गर्दी होती. रेल्वेत एकूण 362 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button